महाराष्ट्रसांगली

नोकरी इच्छुक उमेदवारांनी आधार क्रमांक आपल्या नोंदणीशी संलग्न करावा : सहायक आयुक्त सं.कृ. माळी

सांगली : सांगली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत www.mahaswayam.gov.in ही वेब पोर्टल उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी नोंद केलेल्या उमेदवारांनी जर आधार क्रमांक आपल्या नोंदणीशी संलग्न करून घेतला नसेल तर तो नोंदणीशी संलग्न करून घेण आवश्यक आहे. भविष्यात ज्यांची नावनोंदणी आधार लिंक असेल तरच उमेदवारांची नावनोंदणी ही उद्योजकांना पाहण्यासाठी उपलब्ध्‍ असणार आहे. तरी सर्व नोंदणीकृत नोकरी इच्छुक उमेदवारांनी पोर्टलवरील नाव नोंदणी आधार लिंक करून घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त सं.कृ. माळी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close