कोल्हापूर जिल्हा मुस्लिम समाज बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मुस्लिम समाज बांधवांनी रमजान सणां निमित्त सामाजिक बांधिलकी आणि समाजातील परिस्थितीचे भान जपत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रमजान ईद या पवित्र सणानिमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण असते. परंतु यावर्षी कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी सर्व नियमांचे पालन करून व शांततेत घरी राहूनच रमजान ईद चा सण साजरा करण्याचे ठरविले आहे.
या दरम्यान करण्यात येणाऱ्या खर्चातून त्यांनी तब्बल ६० लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील आरोग्य विभागासाठी दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आय.जी.एम.रुग्णालय, इचलकरंजी यांना मुस्लिम समाज, इचलकरंजी यांनी 30 लाख रुपये तर बैतुल माल कमिटी, कोल्हापूर यांचे कडून सी.पी.आर.रुग्णालय, कोल्हापूर या शासकीय रुग्णलयास रुपये 30 लाख आय.सी.यु. युनिटसाठी देऊन मुस्लिम समाज बांधवांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे.