ताज्या घडामोडी

सांगलीकरांनो दक्ष रहा ही विनंती : मंञी जयंत पाटील

सांगलीतील कोरोनाबाधित रुग्णाला आपल्याला वाचवता आले नाही,

सांगलीतील विजयनगर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. आज त्या रुग्णाचे दुर्दैवाने निधन झाले आहे. इस्लामपूरातील कोरोनाच्या रुग्णांना आपण सुखरूपपणे बाहेर काढले मात्र या रुग्णाला वाचवता आले नाही याची खंत वाटते आहे. तसेच दुःख होत आहे.

शेवटच्या स्टेजमध्ये असताना त्या रुग्णाला कोरोना असल्याचे निदान झाले. रुग्णाला हृदयविकाराचाही त्रास होता. माझी सांगलीकरांना विनंती आहे की, आपल्याला कोरोनाची लक्षणं असेल तर ताबडतोब आपली तपासणी करून घ्या, आपण वेळीच त्यावर उपचार करू.

मी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाशी चर्चा केली आहे. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा आता शोध सुरू आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाईल तसेच परिसरही सील केला गेला आहे. सांगलीकरांनी दक्ष रहावं अशी माझी विनंती आहे
🙏🙏 श्री. जयंत पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा🙏🙏

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close