ताज्या घडामोडी

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती..
असा महामानव.. जो पुन्हा होणे नाही.
शिका-संघटित व्हा-संघर्ष करा हा मूलमंत्र देणाऱ्या बाबासाहेबांची जयंती म्हणजे आंबेडकरी बंधू भगिनींचा जणू सणच..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही जयंती घराघरात आणि मनामनांत साजरी करण्यात आली.
भिलवडी काँग्रेस पार्टीच्या वतीने ही जयंती अभिनव पद्धतीने साजरी करताना पंचशीलनगर,साठेनगर आणि साखरवाडी येथील प्रत्येक घरामध्ये फळे आणि मिठाई देण्यात आली.याच बरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक घरामध्ये एक डेटॉल साबणही देण्यात आला.

संग्रामदादा पाटील,बाळासाहेब काका मोहिते,विलास अण्णा पाटील, चंद्रकांत भाऊ पाटील, बी डी पाटील सर, मोहन तावदर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. भिलवडीतील सर्व पत्रकार मंडळी आणि भारती विद्यापीठ परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close