ताज्या घडामोडी
वाराणसीहून आलेले 33 प्रवासी इन्स्ट्युशनल कॉरटाईनमध्ये : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली : सांगली जिल्ह्यातील काही प्रवाशांना घेवून वाराणसीहून एक बस सांगली जिल्ह्यात आली आहे. अशी माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन यातील 33 प्रवाशांना शासकीय तंत्रनिकेतन येथील इन्स्ट्युशनल कॉरटाईनमध्ये दाखल करुन या सर्व प्रवाशांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविले आहेत. सध्या यापैकी कोणालाही लक्षणे नाहीत. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
Share