ताज्या घडामोडी

कोरोना विरोध्दच्या लढ्यात बँक ऑफ इंडियाचा मदतीचा हात ;आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व साबण वाटप

सांगली : बँक ऑफ इंडियाने व्यावसायिक सामाजिक बांधिलकी अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व इस्लामपूर नगर परिषदेस मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकीची जपणूक केली.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून या यंत्रणेत अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियातर्फे सांगली मिरज कुपवाड महानगरालिका आणि इस्लामपूर नगर परिषदेच्या आरोग्य सेवकांना मास्क व अँटी सेप्टिक साबणाचे वाटप करणेत आले. बँकेचे जिल्हा अग्रणी प्रबंधक आर. पी. यादव यांच्याहस्ते हे साहित्य आयुक्त नितीन कापडणीस व इस्लामपूरच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांचेकडे सुपूर्द करणेत आले. या वेळी अनंत बिलगी, नदीम पठाण, वीरेंद्र देसाई, विखे हजर होते.
कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे. अशा प्रसंगी जबाबदार नागरिक म्हणून समाजातील सर्व घटकांनी शक्य त्या प्रकारे शासनाला मदत करावी, घरी सुरक्षित राहून समाजाला व प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी बॅंकांच्या डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेऊन बँकांमधील अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन यादव यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close