सांगली

कोविड-19: सर्दी, ताप, खोकला आहे घाबरु नका हेल्पलाईन क्रमांक 9821808809 वर संपर्क साधा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

आरोग्य विषयक समस्यांसाठी जिल्हाप्रशासनातर्फे हेल्पलाईन सुरु
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय व्यवसायीकांकडे अनेकदा अडचणीचे होते. अशा स्थितीत त्यांना मदत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हेल्पलाईन क्रमांक 9821808809 सुरु करण्यात आला आहे . यामध्ये जिल्हा प्रशासनाला सांगली आणि मिरज येथील आयएमएच्या वैद्यकीय व्यवसायीक आणि वरुण जैन यांची मदत झाली आहे. नागरिकांनी आरोग्य विषयक समस्यांसाठी विशेषत: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्यांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील जनतेला आरोग्य विषयक समस्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक 9821808809 उपलब्ध करुन देत असताना यावेळी आयएमए सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजीतसिंह जाधव, डॉ. नितीन पाटील, आयएमए मिरजचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर, डॉ. चड्डा, डॉ. योगेश साळुंख, डॉ. रियाम मुजावर, डॉ. संजय कुरेशी, डॉ. अविनाश झळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 च्या अनुषंगाने सर्दी, ताप, खोकला अंगदुखी या प्रकारची लक्षणे असतील अशांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना तज्ञ डॉक्टरांशी या हेल्पलाईन क्रमांकावरुन थेट संपर्क करुन देण्यात येईल. हे डॉक्टर्स रुग्णांशी बोलून त्यांचा कुठे प्रवास झाला आहे का किंवा काय लक्षणे आहेत हे तपासून आवश्यकतेनूसार सल्ला देतील. यामधून जर रुग्णांनी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून सल्ला घेण्याची आवश्यकता दिसून आल्यास त्याप्रमाणे सल्ला देण्यात येइल.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या हेल्पलाईन क्रमांकाच्या सुविधेचा लाभ घ्यावा. तथापि, आरोग्याशी निगडीत समस्यांसाठीच या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या अनुषंगाने किंवा अन्य कोणत्याही समस्यांसाठी आपत्ती निवारण कक्षाशी 0233-2600500, टोल फ्रि क्रमांक 1077, मोबाईल क्रमांक 8208689681/9370333932 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close