ताज्या घडामोडी

कोरोना आणि दिल्लीतील मरकज धार्मिक कार्यक्रम

गेले काही दीड-दोन महिने कोरोना व्हायरसचे संकट जगभर घोंघावत असताना दिल्लीत मुस्लिम तबलीगी जमातीचे हजारो लोक मरकजमध्ये त्यांच्या काही धार्मिक कार्यक्रमा निमित्ताने एकत्र जमले होते ही बाब निश्चितच अत्यंत धक्कादायक आहे. आता तेथून बाहेर पडलेल्या अनेक जणांमूळे हा संसर्ग देशातील विविध राज्यात वेगाने पसरत आहे हे ही चिंताजनक आहे.
आता ‘मरकज’चे प्रमुख ट्रस्टी आणि पोलिस यंत्रणा राज्यसरकार ह्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप ह्यांचा लपंडाव चालू आहे. कोण बरोबर कोण चूक ह्या वादात सामान्यांना मुळीच देणे घेणे नाही परंतु मरकजच्या व्यवस्थापकीय कमिटीने मुळी गांभीर्यच घेतले नाही. अर्थात तशी मानसिकताच नसावी असे खेदाने म्हणावे लागते. आज जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना मरकजमध्ये धार्मिक संमेलन आयोजीत करूण कोणता संदेश ते देवू इच्छित होते हेच मुळी कळत नाही. खरे तर तबलीक जमात ही कित्येक पिढ्या धर्माचा प्रचार इस्लामचा संदेश अगदी शहरापासून खेड्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आली आहे. खरे तर त्यांच्याकडून ह्या क्षणी अपेक्षित नव्हते अर्थात हा क्षण आपल्या कार्यकर्त्यामार्फत कोरोना संदर्भाची जनजागृती जागरुकता आणि खबरदारीच्या उपायासंबंधी पाऊल टाकले असते तर ते अधिक क्रांतीकारक ठरले असते.


तबलीक जमातीचे मरकजचे प्रमुख मौलाना साद ह्यांच्या वादंग विधानामुळे मात्र मुस्लिम समाज संभ्रमात पडू लागला आहे. कुराण आणि इस्लामचा चुकीचा संदेश देण्याची त्यांची ख्याती. दुर्दैवाने निरक्षर धर्मांध युवक त्यांच्या आवाहनाला बळी पडतात म्हणूनच फेब्रुवारी 2017 मध्ये दारुल उलूम देवबंदने तबलीक जमातीशी संबंध तोडून फतवाही जाहीर केला होता. मरकजच्या कारवाई नंतर देखील त्यांची वक्तव्ये अल्लाहवर विश्वास ठेवा कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्र वाचतात अल्लाह काही तरी अडचणी निर्माण करतो त्याला पाहायच असत की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतोय? मशिदी बंद करायला हव्यात? टाळे लावायला हव्यात ह्यावर ते कडाडून हल्ला करतात. ह्यावरूनच त्यांचे इस्लामचे ज्ञन तोकडे स्पष्ट होते.
जगातील मुस्लिम तो कोणत्याही देशाचा असो. ‘कुराण’ आणि प्रेषिताची विचारसरणी हाच त्याचा जीवन मार्ग असतो. परंतु साद सारख्या मौलानामुळे भारतीय मुस्लिमांची अवस्था भरकटल्यासारखी होते. म्हणूनच इस्लामची खरी तत्वे हे अभ्यासक विचारवंत दिन-दुनिया जाणणारे उलेमा ह्यांच्याकडून आजच्या क्षणी प्राप्त होणे महत्वाचे वाटते.
नेमके ह्याच कालावधीत जगातील इतर मुस्लिम संघटना, विचारवंत, धर्मगुरुनी कोणती पाऊले उचलली होती ते पाहूया? 6 मार्च पासून असेंब्ली ऑफ मुस्लिम जुर्टीज् ऑफ अमेरिका ह्यांच्या सूचनेनुसार ज्यामध्ये मुस्लिम विचारवंत धर्मगुरु होते. धार्मिक संमेलने मशिदीतील नमाज पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच सरकारी आदेशाचे सोशल डिस्टनींग 56 जणांव्यतिरिक्त एकत्रित येणार्‍यावर निर्बंध घातले तीच बाब. मुस्लिमांची पंढरी असणार्‍या सौदी अरेबियाची सत्तारूढ असलेले मंत्री अब्दुल लतीफ अल शेख ह्यांनी देखील घरात बसून नमाज अदा करण्याचे आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहासाठी असलेली अंतिम प्रार्थना (जनाजा नमाज) मशिदीमध्ये घेण्याची पूर्णत: निर्बंध घालण्यात आले कबरस्तानमध्ये मोजकी 56 जण तेही सोशल डिस्टन्स सांभाळून धार्मिक विधी करण्याची अनुमती दिली आहे. जगभरातील सर्व मुस्लिम राष्ट्रामध्ये जेथे बहुतांशी मुस्लिमधर्मीय सत्ताधारक आहेत तेथे हे घडू शकते तर भारतात का नाही? ह्याची मुस्लिमांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे वाटते.
प्रेषितांचा संदेश किंवा कुराणमध्ये देखील सद्यस्थितीबाबत स्पष्ट उल्लेख आढळतात प्रेषित संबोधित करतात. आणीबाणीच्या काळात किंवा संसर्गजन्य महारोगाने पीडीत असल्याने व्यक्तिने कदापीही घराबाहेर पडू नये. शक्य झाल्यास घरातच नमाज अदा करावी मशिदीमध्ये मात्र पूर्णत: टाळावी उद्देश हा की इतरांना संसर्ग होवू नये.
प्रेषितांनी आपल्या मत्वामुळे ‘आरोग्य आणि सुरक्षितता’ ह्या दोन बाबींनाच सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आपल्या वागणुकीमुळे किंवा स्वभावामुळे जर शेजारील नाराज असेल तर तुम्ही जीवनामध्ये पूर्णत: अपयशी आहे असेच समजावे. परंतु दुर्दैवाने साद सारख्या धर्मगुरुंनी ह्या काळात मुस्लिमांना मशिदीमध्ये येवून मरण्याचे आवाहन म्हणजे मूर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल ह्या उलट प्रेषितांनी हजारो वर्षापूर्वी संसर्गजन्य रोगामुळे घरीच मृत्यू होवून, इतरांना बाधा न आणणार्‍याला ‘हुतात्मा’ (शहिद)चा दर्जा दिला आहे. केवढी ही विचारांची तफावत. खरे तर समाजानेच अशा अज्ञानी, ढोंगी दिशाभूल तत्वज्ञान देणार्‍यांना हद्दपार केले पाहीजे.
कुराण (संदर्भ 5:32) स्पष्ट फर्मावण्यात आले, जी कोणी व्यक्ती पृथ्वीतलावर उपद्रव पसरवण्याबरोबर एखाद्या व्यक्तिला ठार करेल समजावे त्याने सर्व मानवांना ठार केले आणि ज्याने कोणी एका जीवाचे ही प्राण वाचविले त्याने सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले. खरे तर मुस्लिमांना खरी गरज आहे. आत्मपरिक्षण करण्याची न्यूनगंड टाळण्याची मानसिकता बदलण्याची आणि खरा ‘ईस्लाम’ समजून घेण्याची अन्यथा. तबलीक जमातीच्या निष्काळजीपणामुळे मुस्लिम समाज बदनाम होण्यास फार वेळ लागणार नाही. समाजातील विचारवंत, अभ्यासक, उलेमा ह्या ‘मरकज’च्या घटनेवरून बोध घेतील का? आणि सरकारी आदेशांचे पालन करण्यासाठी मुस्लिमांना प्रोत्साहीत करून पुढे सरसावतील
का?

– अस्लम जमादार

(लेखक मुस्लिम विषयाचे अभ्यासक आणि पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आहेत.)

tablighi-jamat, corona

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close