भिलवडी परिसरातील दारू ,मावा गुटखा विकणारे व खरेदी करणाऱ्यावर कारवाई करणार : सहाय्यक पो.नि.कैलास कोडग

भिलवडी : भिलवडी ,माळवाडी ,चोपडेवाडी, सुखवाडी ,खटाव ,वसगडे ,खंडोबाचीवाडी ,भिलवडी स्टेशन ,धनगाव ,अंकलखोप परिसरात दारू ,मावा गुटखा विकणारे व खरेदी करणाऱ्यावर कारवाई करणार, असा इशारा भिलवडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिला आहे.
वरील गावात दारू ,मावा ,व गुटखा छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे . देशभरात कोरोनामुळे जो 21 दिवसाचा lockdown घोषित केलेला असताना सुद्धा काहीजण खरेदी व विक्री बेकायदेशीरपणे करत आहेत. त्यामुळे बरेचजण घराबाहेर पडत आहेत. सदर गोष्टी या शासनाने घेतलेल्या निर्णयाचा विरोधात आहे .काही व्यक्ती घरामध्ये मावा , गुठखा ,तंबाखू आणून बेकायदेशीरपने किंवा मुद्दामपणे फोन करून अथवा व्यक्तिमार्फ़त पोहच करत आहेत .सदर मावा ,गुटखा ,तंबाखू खाऊन अनेक व्यक्ती थुंकत असतात. त्यामुळे कोरोना सारख्या आजाराचा प्रसार वेगाने देखील होत आहे .दारू ,मावा, गुटखा ,तंबाखू या जीवनावश्यक गोष्टी नसून त्या बेकायदेशीर पने विकणे आहे . त्यामुळे जमावबंधीचे उल्लंघन म्हणून गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पलूस तालुक्याचे भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी सांगितले आहे.