सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोनो विषाणूचे संसर्ग रोखण्याकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 01 एप्रिल 2020 रोजीच्या 0.01 वाजल्या पासून 14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) व (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
सदरचा आदेश पुढीलबाबतीत लागू राहणार नाही जीवनावश्यक वस्तु (उदा. अन्न धान्य, भाजीपाला, फळे, मांस, विक्री केंद्रे, किराणा, दूध, पाणी पुरवठा, इ पुरवठा करणारी वाहने, अत्यावश्यक सेवा पुरवठा करणारी वाहने, शेती मशागतीच्या कामासाठी, सर्व वैद्यकीय सेवा पुरविणारे खाजगी/शासकीय डॉक्टर्स, कर्मचारी, कायदेशीर कर्तव्य बजावीत असणारी अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन, कोरोना नियंत्रण व निर्मूलनासाठी कार्य करणारे शासकीय/खासगी वाहने, सर्व शासकीय वाहने, वैद्यकीय उपाचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती, बँकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा व विमा कंपन्या यांचे कर्मचारी, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणारे कर्मचारी, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे (मिडिया) इत्यादी.
00000
जनावराचे आठवडा बाजार 14 एप्रिल पर्यंत बंद
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जनावरांचे आठवडा बाजार 14 एप्रिल पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहेत.
याबाबत सर्व शासकीय , निमशासकीय व खाजगी आस्थापनांना निर्देश देण्यात येत आहेत त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी . आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.