महाराष्ट्रसांगली

अत्याधुनिक प्रयोगशाळेचा सांगली जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांना होणार लाभ : पालकमंत्री जयंत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे सुरु करण्यात येत असलेल्या
प्रयोगशाळेची पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी

सांगली : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होत असून सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत याचे 25 रुग्ण आहेत. प्रशासनाने रात्रंदिवस एक करुन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोविड-19 विषाणू तपासणी प्रयोगशाळा उभी केली आहे. या ठिकाणी सिटी स्कॅन, एमआरआय, टु डी इको, सोनोग्राफी, लिक्विड ऑक्सिजन या सर्व सुविधा आहेत. सदरची प्रयोगशाळा ही महाराष्ट्रातील अत्याधुनिक प्रयोगशाळा असून याचा सांगली जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांनाही लाभ होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
कोविड-19 विषाणूच्या तपासणीसाठी मिरज येथे सुरु करण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेची पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, मिरज शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, जे.जे. रुग्णालयाच्या अभिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, मिरज येथे सुरु करण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेत सॅम्पल टेस्टिंग घेण्यात आले असून येणाऱ्या अहवालाचे रिपोर्ट पुण्याला NIV ला पाठविण्यात येणार आहे. त्यांचे ॲप्रुव्हल घेतल्यानंतर नियमितपणे प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येईल. ज्यामुळे सांगली, कोल्हापूर, सोलापूर, गोवा, कर्नाटकातील काही भाग, सिधुदुर्ग, रत्नागिरी संशयित रुग्ण असल्यास त्यांच्या स्वाबची तपासणी या ठिकाणी करण्यात येईल. यापुर्वी हे स्वाब पुण्याला पाठविण्यात येत होते पण, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ही प्रयोगशाळा सुरु झाल्याने एक अतिशय चांगली सुविधा अजुबाजुच्या जिल्ह्यांनाही उपलब्ध होत आहे.
सांगली जिल्ह्यात दिनांक 30 मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील चार जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी एक व्यक्ती परदेश प्रवास करून आलेली महिला होती. तर उर्वरित तीन न्युमोनियाचे रुग्ण होते.त्यांनी कोणताही परदेश प्रवास केला नव्हता. या चौघांचेही स्वाब कोरोना चाचणी अंती निगेटिव्ह आढळून आले आहेत. इस्लामपुरातील कोरोनाग्रस्त कुटुंबातील सदस्य व त्यांचे निकटवर्तीय यांच्याशिवाय सदर विषाणूचा संसर्ग अन्य लोकांपर्यंत गेला नाही. ही बाब दिलासादायक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या पध्दतीने इस्लामपुरातील परिसर सील केला आहे. ते पाहता कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी खोटी माहिती पसरविणे, अपप्रचार करणे, अफवा पसरविणे याबाबी अत्यंत गंभीर असून यांची दखल घेण्यात आली आहे. याप्रवृत्ती आळा घालून समाजात अपप्रचार पसरविण्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close