ताज्या घडामोडी

इस्लामपूर येथे २५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. आज या रुग्णालयाला भेट दिली व रुग्णांच्या तब्येतीची माहिती घेतली. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मुंबईतील जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. या भेटीदरम्यान शासकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी चर्चा केली. सध्याच्या घडीला रुग्णालयात ३१५ बेड्स उपलब्ध आहेत. ज्यात १५ आय.सी.यू बेड्स आहेत. सिटी स्कॅन, एम.आर.आय. या सुविधाही रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच येत्या ३-४ दिवसात कोरोना तपासणी केंद्राची निर्मिती केली जाईल. अधिक व्हेंटिलेटर व पीपीईची मागणी आहे. ही मागणीही पूर्ण केली जाईल.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल.

#WarAgainstVirus

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close