ताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्यात आणखी 12 व्यक्तींना कोरोनाची लागण : कोरोना बाधितांची एकूण संख्या 24

सांगली : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 776 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 74 व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 50 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 24 जणांचे स्वॅब टेस्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यापैकी एक व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील आहे. इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 40 व्यक्ती असून होम क्वॉरंटाईन असलेल्या 662 व्यक्तींपैकी 132 व्यक्तींचा 14 दिवसाचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 530 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close