कृषी मंत्री डॉ.विश्वजित कदम यांची भिलवडीत भेट, सहानुभूतीपूर्वक विचारपूस

काळजी घ्या : विश्वजीत कदम यांचे आवाहन
भिलवडी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री डॉ.विश्वजित कदम साहेब यांनी नागरिकांची भेट घेऊन सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली. यावेळी त्यांनी पंचशीलनगर व साठेनगर येथील नागरिकांची ही भेट घेतली.
गेल्या आठ दिवसांपासून मंत्री विश्वजित कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, की कोणीही घराच्या बाहेर पडू नका, स्वतः काळजी घ्या. काही अडचणी आल्यास संपर्क साधा.
माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामदादा पाटील, माजी उपसरपंच मोहन तावदर, चंद्रकांत पाटील, दक्षिण सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब मोहिते, उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन संभाजी सूर्यवंशी, सचिन पाटील, ‘दर्पण’ चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे, के.प्रफुल्ल आदी पत्रकार व नागरिक उपस्थित होते.