ताज्या घडामोडी

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत

सांगली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी कालावधीमध्ये येणाऱ्या 21 दिवसामध्ये पूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू केली आहे. सदर कालावधीमध्ये ग्रामीण भागात नागरिकांना अत्यावश्यक वस्तू (भाजीपाला, दूध, किराण माल, औषधे व इतर) नियमित घरपोच मिळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करावे. असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यामध्ये किराणमाल दुकानदार, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, औषध दुकानदार, आर.ओ.प्लाट इतर अत्यावश्यक बाबी या विक्रेत्यांच्या मोबाईल क्रमाकांची यादी प्रसिध्द करावी. ग्रामस्थांची मागणी दुरध्वनीव्दारे नोंद करून घेवून त्या दुकानदारांकडून साहित्य घरापोच करावे .यामध्ये जादा दराने विक्री होणार नाही व एका भागामध्ये एकाच माणसाकडून साहित्य पाहोच केले जाईल यांची दक्षता ग्रामपंचायतीने घेण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.
तसेच नागरिकांना आवश्यक तेवढेच साहित्य देण्यात यावे. कोणीही घरी अनावश्यक साठा करणार नाही याचीही दक्षता घ्यावी. पुढील 21 दिवसांचे नाशवंत नसणारे साहित्य एकदाच द्यावे. दररोज सुटे साहित्य मागविणे व पोहोच करणे टाळावे. साहित्य पाहोच करणारे हे स्वस्थ असावेत यांची पूर्ण काळजी घ्यावी. याबाबत गा्रमपंचायतीकडून नियोजन करून नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल या बाबत दक्षता घ्यावी. स्थानिक परस्थितीनुसार यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर आवयश्यक ते बदल करून कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close