ताज्या घडामोडी

कोरोनाबाधित रुग्णांचा सर्व खर्च महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून होणार : ना. राजेश टोपे

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव हे मोठं जागतिक संकट आहे. मात्र, हा आजार बरा होऊ शकतो. विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेले कोरोना बाधित रुग्ण बरे देखील झाले आहेत. यातील पाच रुग्णांना आज घरी पाठवण्यात येणार असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात येईल. मात्र पुढील काही दिवस त्यांना होम कॉरण्टाईन राहावे लागेल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ५२ वर गेला आहे. या सर्व रुग्णांचा खर्च हा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य या महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून केला जात आहे अशी, माहितीही आरोग्य मंत्र्यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close