यशस्वी उद्योजकाला अपार कष्ट आवश्यक : अविनाश पवार

मुंबई : नवीन उद्योजकांनी कष्ट करण्याची गरज आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा, असे उद्योजक अविनाश पवार यांनी सांगितले.
विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व उद्योजकता विकास केंद्र मुंबई द्वारा आयोजित आणि महाराष्ट्र उद्योग व्यापार गुंतवणूक सुलभता कक्ष, मुंबई यांच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अठरा दिवसीय निशुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे (REDP) पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जमुक्ती लाभार्थ्यांसाठी पनवेल येथे मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात अविनाश पवार यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात अविनाश पवार यांनी विविध शासकीय योजनेची माहिती दिली. आजच
च्या मार्गदर्शनाने प्रशिक्षणार्थ्यांनी मध्ये उत्साह निर्माण झाला. या कार्यक्रमास ऋषिकेश कउटकर व महेश जावळे यांचे सहकार्य लाभले.