ताज्या घडामोडी

लोकांमधून कोरोनाची भिती व संभ्रम दूर करा :राज्य आरोग्य सोसायटीचे प्रशासनाला निर्देश

सांगली : जगभरात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असून भारतातही अनेक ठिकाणी रूग्ण आढळले आहेत. या आजाराविषयी लोकांच्या मनात भिती व गैरसमज मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने आजाराविषयी लोकांच्या मनातील भिती व गैरसमज दूर करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे निर्मिती करण्यात आलेले आरोग्य शिक्षण साहित्याचा आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे निर्देश राज्य आरोग्य सोसायटी सार्व्रजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या कार्यालयातर्फे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने प्रशासनास मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे. या आजाराविषयी लोकांच्या मनात भिती व गैरसमज मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे या आजाराविषयी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे माहिती देणारे आरोग्य शिक्षण साहित्य यामध्ये पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग, रेडिओ जिंगल्स, माहिती पुस्तिका इत्यादीचा समावेश आहे. या सर्व साहित्याचा वापर कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करण्यात यावा व लोकांमधील भिती व संभ्रम दूर होईल हे पहावे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या विमानतळावर पदरेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळूल आलेल्या प्रवाशांना शासकीय रूग्णालयात आयसोलेशन वॉर्डात दाखल करणे आवश्यक आहे. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी तसेच घशातील नमुना (Throt Swab) घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावा. बाधित देशामधून आलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या प्रवाशांचा दूरध्वनीव्दारे 14 दिवसापर्यंत पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड करण्यात आल्याबाबत खात्री करावी तसेच त्या ठिकाणी गंभीर रूग्ण दाखल झाल्यास अशा गंभीर रूग्णासाठी व्हेन्टीलेटर व इतर सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी.
कार्यक्षेत्रातील खाजगी रूग्णालयामध्ये सुध्दा आयसोलेशन वॉड सुरू करणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी चेकलिस्ट तयार करण्यात आली असून त्यानुसार खाजगी रूग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवावेत. बाधीत देशातून आलेल्या ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळून येतील अशा रूग्णांचा Throt Swab negative आल्यानंतर 14 दिवस पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यादृष्टीने रूग्णालयातून डिसचार्ज झालेल्या रूग्णांचा दूरध्वनीव्दारे पाठपुरावा आरोग्य यंत्रणेमार्फत करावा. एन-95 मास्क तसेच सर्जीकल मास्क याचा अनावश्यक वापर जनतेकडून होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शास्त्रीय माहिती लोकापर्यंत पाहोचणे आवश्यक आहे. तसेच खाजगी औषध व्यावसायिकांकडून या साहित्याची विक्री जास्त किंमतीने करणे व त्यांचा तुटवडा निर्माण होणे यावर नियंत्रण ठेवण्यात यावे.
कार्यक्षेत्रातील हॉटेलमध्ये बाधीत देशातून आलेले प्रवाशी वास्तव्य करतात. अशा प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शासकीय रूग्णालयामध्ये संदर्भीत करणे व ते ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या कार्यक्षेत्रामध्ये निर्जुंतूकीकरण करण्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना हॉटेल व्यावसायिकांना देण्यात याव्यात. तसेच या विषयीच्या तांत्रिक मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची बैठक बोलावून त्यांना या आजाराबाबत माहिती देणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच संशयिंत रूग्णांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही व आयसोलेशन वॉर्ड तयार करणे याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात. आडीएसपी कार्यक्रमांतर्गत समितीची स्थापना करण्यात आलेली असून या समितीची बैठक वारंवार आयोजित करावी व यामध्ये संपूर्ण परिस्थितीचा नियमितपणे आढावा घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी मोठे समारंभ / कार्यक्रम शक्यतो टाळावेत, अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाच्या वतीने जारी करण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शित सूचनांचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close