महाराष्ट्र
कोरोना विषाणू : 93 जणांना रुग्णालयातून घरी सोडले : आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत आलेल्या ४५८ विमानांमधील ५५ हजार ७८५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत. 93 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून 95 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन, हॉंगकॉंग, थायलंड,सिंगापूर, द.कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशातील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर केली जात आहे.
Share