‘आरसेटी’चे महिलांसाठी वस्त्रालंकार रचना प्रशिक्षण उत्साहात
सांगली : जिल्हा विकास यंत्रणा सांगली, पंचायत समिती मिरज व आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे 10 दिवसांच्या महिलांसाठी वस्त्रालंकार रचना या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अग्रणी जिल्हा प्रबंधक आर. पी. यादव, आरसेटी संचालक एन. एम. पठाण, प्रदिप साळुंखे व प्रशिक्षक प्रवीण पाटील उपस्थित होते.
ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांना एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी महिलांसाठी वस्त्रालंकार रचना प्रशिक्षण घेण्यात येत असून या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांचे उत्पन्न वाढावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने आरसेटी सांगली येथे महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
000000000000000000000
सांगली येथे महिलांसाठी कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण
सांगली : जिल्हा विकास यंत्रणा सांगली, पंचायत समिती मिरज व आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे महिलांना 10 दिवसांचे कागदी पिशव्या, लखोटे आणि फाईल्स तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या समारोप प्रसंगी बक्षिस वितरण व सहभागिता प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाबार्ड चे असिस्टंट जनरल मॅनेंजर लक्ष्मीकांत धानोरकर, आरसेटी निदेशक एन. एम. पठाण, प्रशिक्षक प्रविण पाटील उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांना एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी कागदी पिशव्या, लखोटे आणि फाईल्स तयार करणे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामुळे उत्पन्न वाढावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले.