सांगलीत शनिवार पासून राज्य शाहिरी महोत्सव

सांगली : सांस्कृतिक कार्य संचालनालय सांस्कृतिक कार्य विभाग यांंच्यामार्फत सांगली येथे दिनांक 22 ते 26 फेब्रुवारी रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे शाहिरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्री राजेंद्र येड्रावकर, महापौर गीता सुतार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, खासदार संजयकाका पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार मोहनराव कदम, आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्धाटन होणार आहे.
राज्य शाहिरी महोत्सवामध्ये दिनांक 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे- दिनांक 22 फेब्रवारी रोजी शाहिर वृषाली कुलकर्णी, शिवाजी शिंदे, संतोष साळुंखे यांचा शाहिरी कार्यक्रम, दिनांक 23 फेब्रवारी रोजी शाहिर आझाद नायकवडी, सीमा पाटील, अजिंक्य लिंगायत यांचा शाहिरी कार्यक्रम, दिनांक 24 फेब्रवारी रोजी शाहिर अनिता खरात, राजनसिंह राजपूत, शिवाजीराव पाटील, यांचा शाहिरी कार्यक्रम, दिनांक 25 फेब्रवारी रोजी शाहिर सुरेश जाधव, सुभाष गोरे, वनिता मोहिते यांचा शाहिरी कार्यक्रम दिनांक 26 फेब्रवारी रोजी शाहिर परशुराम सुर्यवंशी, प्रसाद विभूते, देवानंद माळी यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे.