क्रीडा

नवराष्ट्रनिर्माणात खारिचा वाटा उचलूया..!

भारत नावाच्या देशातील अर्थात आपल्या विषमता ग्रस्त अशा सर्व श्रेष्ठ संस्कृती नामक मायावी व्यवस्थेतील अत्यं भयंकर आणि भयानक चांडाळांनि निर्माण केलेला सर्वांगीण संर्वंकश सत्याननशाला पर्यायी पाखंडी शब्द म्हणजे कर्मकांड. एकदाक आपण एरियल अंटेना वाल्याच्या साक्षीन अन् त्याच्याच शुभ हस्ते कर्माच कांड अर्थात श्राद्ध घातले की अधर्माचा उदय होतो आणि अधर्माचा पाया हा अंधश्रद्धाच असतो. आणि बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना टाईप स्वंयभू जगाचा महागुरू बनायला निघालेल्या आंम्हा भ्रमिष्टांच्या डीएने मध्ये अधर्म आणि अंधश्रद्धेच मांजरपाठी पाखंड चांगलच मुरलयं.या आपल्या आवतारन पिडलेल्या देशाला स्वर्गातला-नरकातला पापातला-पुण्यातला,मोक्षातला-की पुर्णजन्मातला एक ही दैवीपितर नावा भामटा या देशाला वाचवायला अथवा समाजाच्या उथानाला प्रत्यक्ष आला नाही.सध्याच्या सर्व समावेश अशा अराजकतेतून भारताला सही सलामत बाहेर कढावयाचे असेल तर सडलेल्या किडलेल्या विषमताग्रस्त अशा बधीर मानसिकतेतून जानीव पूर्वक आपल्या बाहेर यावे लागेल आणि अधर्म, अंधश्रद्धा, कर्मकांडाची समरसतेच्या नव्हे तर समतेच्याच होमा मध्ये आहूती द्यावी लागेल. सामाजिक एकता आणि भारतीय अखंडता संवर्दीत करण्यासाठी संविधानाचा आणि धार्मिक नाही तर सर्व समावेश अशा भारतीय संस्कृतीचाच मार्ग स्वीकाराण्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपणासमोर उपलब्ध नाही. संविधानाचे निर्माते असलेल्या प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किमान दोन विचार कायमच लक्षात ठेवले पाहिजेत, ते म्हणाले होते या आपल्या संविधानाच्या माध्यमातून भारत राष्ट्र बनण्याच्या प्रकीएतून जात आहे.तेंव्हा आपण सर्वजन प्रथमतः भारतीय आहोत आणि अंतिमताही भारतीयच आहोत.कारण ते स्वत:ही मी प्रथमता भारतीय आहे आणि अंतिमतः ही भारतीयच आहे.असेच म्हणत असत. तेंव्हा आता राष्ट्र मेले तर कोण जगेल आणि राष्ट्र जंगले तर कोण मरेल ? या संजीवनीला स्मरुन थंडमेंदूनं जादूचे प्रयोग बघत बसण्यापेक्षा झूमंतरच्या नजरबंदीतून बाहेर पडून आत्मपरीक्षण करून जमेल तसा भारताला जोडण्याचा अर्थात नवराष्ट्रनिर्माणात खारिचा वाटा उचलूया.

– विनायक यादव -* 9890341110

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close