ताज्या घडामोडी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या योजनेतील अटीनुसार, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील काही पात्र लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये लाभार्थ्याचे नाव आधारकार्ड वरील नावाप्रमाणे नसणे, लाभार्थ्याचे बँक खाते क्रमांकामध्ये तफावत असणे, बँकेचा आय.एफ.एस.सी. कोड चुकीचा असणे, आधारकार्डचा क्रमांक अवैध असणे या त्रुटीमुळे काही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू शकतात. या कारणांमुळे लाभार्थी वंचित राहू नयेत म्हणून अशा त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांची यादी चावडी, तलाठी कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अशा त्रुटी असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची एकूण संख्या 82 हजार 767 इतकी आहे. या लाभार्थ्यांनी नजीकच्या तलाठी कार्यालयात अथवा तहसिल कार्यालयात त्वरीत संपर्क साधून दुरूस्ती करून घ्यावी, जेणेकरून योजनेचा लाभ मिळण्यास अडचण होणार नाही. तहसिल कार्यालय अथवा तलाठी कार्यालय येथे संपर्क करताना लाभार्थ्यांनी बँक खाते पुस्तक व आधारकार्ड झेरॉक्स सोबत घेऊन जावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
अशा प्रकारच्या दुरूस्तीबाबत जिल्ह्यामध्ये दिनांक 7 व 8 जानेवारी 2020 रोजी प्रत्येक तहसिल कार्यालयात विशेष शिबीर आयोजित करून कार्यवाही केली आहे. तथापि अजूनही ज्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक / आय.एफ.एस. सी. कोड दुरूस्तीचे काम शिल्लक आहे, त्या लाभार्थ्यांनी दुरूस्तीसाठी त्वरीत संपर्क करणे आवश्यक आहे. ज्या खातेदारांचे नाव व आधारकार्डवरील नाव यामध्ये तफावत आहे, अशा खातेदारांना पी.एम.किसान पोर्टलवर Farmer Corner मध्ये Edit Adhar Failure Records या सुविधेचा वापर करून त्यामध्ये दुरूस्ती करता येईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close