महाराष्ट्र

पूरप्रवण गावांतील आपत्ती व्यवस्थापन आराखड्यासाठी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना 10 फेब्रुवारी पासून प्रशिक्षण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व एन.आय.डी.एम. नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण गावातील गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या अनुषंगाने एकूण 104 गावांंतील सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 या वेळेत ग्रेट मराठा हॉटेल, सांगली येथे घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
प्रशिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सर्व पूरबाधित गावातील सरपंच यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तोंडओळख, दिनांक 11 व 12 फेब्रुवारी रोजी मिरज तालुक्यातील 12, पलूस 14, वाळवा 18 व शिराळा तालुक्यातील 8 अशा एकूण 52 पूरप्रवण गावातील तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण, दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी मिरज तालुक्यातील 8, पलूस 11, वाळवा 20 व शिराळा तालुक्यातील 13 अशा एकूण 52 पूरप्रवण गावातील तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
पूरप्रवण गावचे सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांना हे प्रशिक्षण अनिवार्य आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग गावामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीस सामोरे जाण्याकामी उपयुक्त असल्याने पूर बाधित गावांचे सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांनी प्रशिक्षण कार्यक्रमानुसार उपस्थित रहावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्याकरिता संबंधितांनी नोडल अधिकारी नियुक्त करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (मो.क्र. 9096707339) यांच्याशी समन्वय साधावा. प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखड्यासाठी गावनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दि. 11 व 12 फेब्रुवारी (सकाळी 9.30 ते सायंकाळी 5) – मिरज तालुका 12 गावे (निलजी, माळवाडी, दुधगाव, ढवळी, अंकली, कसबे डिग्रज, बामणी, पदमाळे, समडोळी, जुनी धामणी, हरीपूर, मौजे डिग्रज), पलूस तालुका 14 गावे (ब्रम्हनाळ, भिलवडी, बुर्ली, सुखवाडी, सुर्यगाव, तुपारी, नागराळे, अंकलखोप, तावदरवाडी, आमणापूर, चोपडेवाडी, राडेवाडी, पुणदीवाडी, पुणदी वाळवा), वाळवा तालुका 18 गावे (बोरगाव, बनेवाडी, भरतवाडी, शिरटे, रेठरे हरणाक्ष, वाळवा, ऐतवडे खुर्द, हुबालवाडी, ताकारी, खरातवाडी, साटपेवाडी, कणेगाव, नरसिंहपूर, बिचूद, जुनेखेड, चिकूर्डे खुर्द, तांबवे, कृष्णानगर), शिराळा 8 गावे (सागाव, देववाडी, आरळा, कांदे, मांगले, पुनवत, मराठेवाडी, कोकरूड).
दि. 13 व 14 फेब्रुवारी (सकाळी 9.30 ते सायंकाळी 5) – मिरज 8 गावे (नांद्रे, इनाम धामणी, सावळवाडी, म्हैशाळ, कर्नाळ, वड्डी, कवठेपिरान, तुंग), पलूस तालुका 11 गावे (माळवाडी, वसगडे, दह्यारी, नागठाणे, धोगाव, अनुगडेवाडी, खटाव, खंडोबाचीवाडी, पलूस, विठ्ठलवाडी, दुधोंडी), वाळवा तालुका 20 गावे (बहे, फार्णेवाडी-बोरगाव, गौडवाडी, कोळे, मर्दवाडी, मिरजवाडी, कासेगाव, धोतरेवाडी, शिरगाव, करंजवडे, मसुचीवाडी, ठाणापुडे, कुंडलवाडी, शिगाव, तांदूळवाडी, देवर्डे, कारंदवाडी, नवेखेड, दुधारी, नेर्ले), शिराळा तालुका 13 गावे (मोहरे, चरण, खुजगाव, बिळाशी, चिंचोली, चिखली, शिराळा खुर्द, काळुंद्रे, सोनवडे, ढोलेवाडी, प.त.वारूण, मणदूर, अस्वलेवाडी). यांचा समावेश आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close